Dahanu darshan
मोठ्या नकाशात Dahanu darshan [ Tribal tourism] पहा
कल्याण बनतंय पर्यटनस्थळ
कल्याण बनतंय पर्यटनस्थळ [ Friday, August 03, 2007 02:31:42 am]कल्याणमधील ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि गणेशघाट शिवस्मारक प्रोजेक्टसाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने दाखवलीय. केडीएमसीनेही ना हरकत प्रमाणपत्र दिल्याने ऐतिहासिक स्थळांचा विकास होऊन कल्याण हे उत्कृष्ट पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येऊ शकतं. काळा तलाव, काळी मशीद, दुर्गाडी किल्ला, पेशवेकालीन अक्षत गणपती, पोखरण आदी स्थळ आणि वास्तूंमुळे कल्याणाच्या वैभवात भर पडली आहे. सरकारी यंत्रणा तसंच कल्याणकरांच्या दुर्लक्षामुळे काळाच्या ओघात बराचसा ऐतिहासिक ठेवा नाहीसा झालाय. तरी अजूनही पर्यटनस्थळ म्हणून विकसित करता यावं इतकी प्रेक्षणीय स्थळं कल्याण आणि परिसरात आहेत. यापैकी काही ऐतिहासिक तसंच सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांच्या सौंदयीर्करणासाठी प्रचंड निधीची आवश्यकता आहे. मात्र बिकट आथिर्क स्थितीमुळे केडीएमसी फारसा निधी उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्यामुळे केंद सरकारच्या एखाद्या योजनेतून यासाठी निधी मिळवता येतो का, याची नगरसेविका स्टेला मोराइस यांनी चाचणी केली. तसा पत्रव्यवहार केंदीय पर्यटनमंत्री अंबिका सोनी यांच्याशी केला. त्या वेळी कल्याण हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं शहर असल्यानं गणेशघाट, काळी मशीद, पोखरण आदींचं जतन आणि सौंदयीर्करण करण्यासाठी केंद सरकारने निधी देण्याची तयारी दर्शवली. सरकारच्या धोरणानुसार निधी उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारनं सौंदयीर्करणाच्या या प्रस्तावांना मंजुरी देऊन तसा अहवाल केंद सरकारकडे पाठवणं आवश्यक आहे. मोराइस यांनी राज्य सरकारच्या पर्यटन खात्याशी संपर्क साधल्यावर केडीएमसीने तसा प्रस्ताव तयार करून या प्रोजेक्टसाठी ना हरकत प्रमाणपत्र असं या खात्यातफेर् कळवण्यात आलं. राज्याचे पर्यटन आणि सांस्कृतिक कार्यसचिव भूषण गगराणी यांनी हे प्रमाणपत्र मिळाल्यावर केंद सरकारकडून निधी मिळवणं शक्य असल्याचं म्हटलं आहे. केंद आणि राज्य सरकारकडून मिळालेय या अनुकूल प्रतिसादामुळे कल्याणमधील ऐतिहासिक वारशाला नवी झळाळी मिळण्याची शक्यता निर्माण झालीय. आता केडीएमसीतील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन तातडीनं ना हरकत प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. केंद सरकारनं दुर्गाडी किल्ल्याजवळील गणेशघाट विकसित करण्यासाठीही निधी देण्याची तयारी दर्शवल्यानं कल्याणकरांच्या जिव्हाळ्याच्या विषय म्हटला जाणारा शिवस्मारक प्रोजेक्ट